Posts

Showing posts with the label NPS

नवीन पेन्शन योजना काय आहे ( NPS- New Pension System )

Image
भारत सरकारने काही वर्षांपूर्वी Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA) ह्या संस्थेअंतर्गत नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे. ही नवीन का? तर पूर्वी पेन्शन मधील रक्कम ही PF अकाउंट मधेच असायची आणि PF मॅनेजर्स ह्या बॅंकाच असल्यामुळे त्यावर साधारण दराने व्याज मिळायचे. थोडक्यात ते रिकरिंग फिक्स डिपॉझिट्स ह्या स्वरुपात असायचे. पण नवीन योजनेत मात्र ह्यातील रक्कम शेअर मार्केट मध्ये गुंतवली जाईल. थोडक्यात हे आता म्युच्युअल फंड च्या SIP सारखे असेल पण म्युच्युअल फंडासारखे कधीही पैसे मात्र काढता येणार नाहीत. ही योजना सर्वांना खुली असून ह्यात भाग घेणे हे ऐच्छिक आहे. (voluntary). पण प्रत्येक सेन्ट्रल गव्हर्न्मेंट नौकराला मात्र ही योजना बंधनकारक आहे. योजना अशी काम करेल. १. PFRDA संस्था बँकांना व पोस्ट ऑफिसना ही योजना चालवायला उद्युक्त करेन. २. बँकेत जाऊन कोणीही (सरकारी, निम सरकारी, प्रायव्हेट, दुकानदार, व्यावसायिक इ इ) दोन प्रकारचे अकाउंट उघडू शकते. ( टियर १ आणि टियर २) ३. अकाउंट उघडल्यावर प्रत्येकाला त्याचा PRAN   (Permanent Retirement Account Number) मिळेल. नौकरी बदलली /सोडली