Posts

Showing posts with the label PMKY

PM किसान – करा स्वतःच नोंदणी आणि मिळवा ६ हजार रूपये

Image
PM किसान – करा स्वतःच नोंदणी आणि मिळवा ६ हजार रूपये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्षी ६ हजार रूपयांचे अनुदान मिळवण्यासाठी वैयक्तिकरित्या शेतकरीही नोंदणी करू शकतात. महाराष्ट्रातील जवळपास ६ लाख शेतकऱ्यांनी अशा प्रकारे नोंदणी केली असून अशा शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम देखील जमा झाली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत चुकलेल्या नावाची दुरुस्तीदेखील शेतकरी स्वतः करू शकतात. केंद्रीय कृषि मंत्रालयाने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर थेट विश्वास दाखवला असून शासकीय यंत्रणेच्या मदतीशिवाय शेतकरी स्वतःच नोंदणी करून थेट बॅंक खात्यात अनुदान मागवून घेत आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्याकरिता थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी pmkisan.gov.in संकेतस्थळावर फार्मर कॉर्नरवर  नवीन नोंदणी  या लिंकवर थेट अर्ज भरता येतो. अर्जाची भाषा इंग्रजी असली तरी अर्जाची रचना सोपी आहे, त्यामुळे राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरल्याची माहिती आहे. ग्रामीण भागात